Homeमहाराष्ट्रलातूर-कल्याण द्रुतगती महामार्ग हा लातूर,आंबेजोगाई,केज,बीड मार्गे करण्यात यावा-इनामदार, बनसोड

लातूर-कल्याण द्रुतगती महामार्ग हा लातूर,आंबेजोगाई,केज,बीड मार्गे करण्यात यावा-इनामदार, बनसोड

केज/प्रतिनिधी

प्रस्तावित लातूर-कल्याण द्रुतगती महामार्ग हा लातूर, आंबेजोगाई, केज,बीड, जामखेड, अहिल्यानगर मार्गे कल्याण हा महामार्ग बीड जिल्ह्यातूनच राबविण्यात यावा असा ठराव केज नगरपंचायत च्या सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला आहे. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन देणार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.
केज नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेमध्ये ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांनी असा ठराव मांडला की, विधानसभेची नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांचे द्वारे कल्याण-लातूर द्रुतगती महामार्गास मंजुरी दिली आहे व तसे जाहीर करण्यात आलेले आहे. सदरील मार्ग हा लातूर, आंबेजोगाई,केज,बीड, जामखेड, अहिल्यानगर मार्गे बीड जिल्ह्यातून राबविण्याबाबत प्रस्तावित आहे. राज्यातील अत्यंत महत्त्वकांक्षी व आर्थिक विकासाला चालना देणारा हा राष्ट्रीय महामार्ग मूळ योजना अनुसार बीड जिल्ह्यातून जाणे अपेक्षित आहे.
हा महामार्ग केज शहरातून गेल्यानंतर शहराची औद्योगिक प्रगती, शेतीमाल वाहतूक व दळणवळण सुलभता, रोजगार निर्मितीसाठी महत्वाचा ठरणार आहे. हा महामार्ग बीड जिल्ह्यातून गेल्यानंतर बीड जिल्ह्यातुन मुंबई,पुणे या ठिकाणी मालवाहतूक, दळणवळण करणे आणखी सोपे होणार असून पर्यायी बीड जिल्ह्याच्या विकासात भर पडणार आहे.
परंतु हा महामार्ग धाराशिव जिल्ह्याकडे वळविण्यासाठी चे प्रयत्न चालू असल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे केज शहरासह परिसराचे व बीड जिल्ह्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याकरिता बीड जिल्ह्याच्या प्रगतीसाठी हा प्रकल्प जीवन संजीवनी देणारा आहे आणि तो बीड जिल्ह्यातूनच जाणे खूप आवश्यक असून त्यासाठी केज शहर व परिसरातील नागरिकांच्या वतीने केज नगरपंचायत मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांना कल्याण-लातूर द्रुतगती महामार्ग हा लातूर, आंबेजोगाई,केज,बीड,जामखेड, अहिल्यानगर मार्गे बीड जिल्ह्यातून राबविण्याबाबत निवेदनाद्वारे विनंती करणे आवश्यक आहे असा ठराव मांडण्यात आला. अनुमोदन गटनेते रामचंद्र गुंड यांनी दिले. यावर सर्वांगीण चर्चा होऊन सर्वपक्षीय नगरसेवकांनी सहमती दर्शवली व एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. अशी माहिती केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारुणभाई इनामदार यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!