केज/प्रतिनिधी
अंबाजोगाई विभागातील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता सौ.शीतल वाजेद सय्यद यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या तांबवा, साबला धर्माळा,तरनळी, नागझरी,कोल्हेवाडी, कासारी व मैंदवाडी या गावांतील सरपंच,उप सरपंच तसेच ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंत्याकडे लेखी निवेदनाद्वारे तात्काळ बदलीची मागणी केली आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे,रब्बी हंगाम सुरू असताना शेती पंपांना दिला जाणारा वीजपुरवठा फक्त ८ तासा वर आणण्याचा आदेश कनिष्ठ अभियंता सय्यद यांनी संबंधित सबस्टेशन ला दिला आहे.यापूर्वी फिडर ओव्हरलोडमुळे गावांचे दोन भाग करून ६ तासांचा टप्पा सुरू होता. मात्र आता सर्व गावांना एकत्र करून फक्त ८ तासच वीजपुरवठा देण्याचा ‘तुघलकी निर्णय’ घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शेतकरी आधीच अतिवृष्टी नापिकी यामुळे त्रस्त असताना जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.तसेच या अधिकाऱ्याची बदली पुढील दोन दिवसांत न झाल्यास सोमवारी कार्यकारी अभियंता कार्यालयात सामूहिक आत्मदहन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, तहसीलदार,खासदार बजरंग बप्पा सोनवणे, आमदार नमिताताई मुंदडा,महावितरणचे अधीक्षक अभियंता बीड तसेच उप कार्यकारी अभियंता केज यांना सादर करण्यात आली आहे.याघटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून महावितरण कडून याबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लाकेले आहे.
























