Homeमहाराष्ट्रराजगुरुनगर मध्ये नगरसेवक पदासाठी एक कोटीचा लिलाव

राजगुरुनगर मध्ये नगरसेवक पदासाठी एक कोटीचा लिलाव

पुणे/ प्रतिनिधी

सत्ताधारी-विरोधक दोघंही मूग गिळून गप्प; आपापसात साटंलोटं असल्याची चर्चा
पिंपरी पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाच्या जागेसाठी चक्क लिलाव झाल्याचं बोललं जात आहे. एका प्रभागात पुरुषांच्या जागेसाठी १ कोटी तीन लाखांची बोली लागली अन् महिलांच्या जागेसाठी २२ लाखांची बोली लागली. अशी चर्चा राजगुरुनगरमध्ये जोरदार सुरु आहे.

मात्र सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही ही मूग गिळून गप्प आहेत. आपापसात साटेलोटे झाल्यानं, ‘तेरी भी चूप ओर मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतल्याची जोरदार चर्चा आहे. बोलीतील रकमेतून शहराचा विकास करायचं असं ही एकमुखी निर्णय झाल्याचं बोललं जात आहे. पण हे कोणत्या प्रभागात घडलं आऐ ते उमेदवार कोण? याबाबतची वाच्यता कोणीचं करत नाहीये.

आज बिनविरोध घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अशात कोण-कोण माघार घेतंय आणि जे माघार घेतात त्याच्या प्रभागात ही बोली लागली का? याबाबत तर्क-वितर्क लावले जाणार हे उघड आहे. मात्र नगरसेवक पदासाठी पाच लाखाच्या आसपास खर्चाची मर्यादा आहे, अशात जर पुरुषांच्या जागेसाठी १ कोटी ३ लाख आणि महिलांच्या जागेसाठी २२ लाखांची बोली लागली असेल तर मग राज्य निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार? कारण भविष्यात निवडणुकांमधील पदांसाठी असा लिलाव होऊ लागला तर ही नवी प्रथा पडण्याची भीती आह

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शंभर मीटर धावण्यात सीमा बळीराम उनवणी यांनी पटकावला दुसरा क्रमांक

अंबाजोगाई /प्रतिनिधी कै.दे.बा.ग योगेश्वरी नूतन विद्यालय प्राथमिक विभाग अंबाजोगाई येथील विद्यार्थी प्रिय सहशिक्षिका व उत्तम खेळाडू.. श्रीमती.सीमा बळीराम उनवणे .या विभागीय स्तरावरील 100 मीटर धावणे...

भारतीय जनता मजदुर संघाचे मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील यांचा विष्णु भाऊ घुले यांच्या...

केज/प्रतिनिधी भारतीय जनता मजदुर संघाच्या मराठवाडा सचिव पदावर निवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा विष्णु भाऊ घुले यांच्या सह मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात...

छत्रपती संभाजीनगर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याचा हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावला

परळी/ प्रतिनिधी काल झालेल्या वसुसाय गाव, ता.गंगापूर जिल्हा छ. संभाजीनगर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याच्या हॉलिबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवला . या यशा...

उमरी रोड भागातील नागरिकांचा लाईटचा प्रश्न अखेर मार्गी

डॉ.हारुणभाई इनामदार व डॉ. सौ. सीताताई बनसोड यांच्या प्रयत्नाला यश केज/प्रतिनिधी केज शहरातील उमरी रोड परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना सुरळीतपणे लाईट नसायची...

नगर मनमाड महामार्गाची दुरुस्तीची व्यथा

अहिल्या नगर प्रतिनिधी - गणेश रणशिंग अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून राहुरी हद्दीतील या मार्गावर आतापर्यंत खूप लोकांचे बळी गेले...

error: Content is protected !!