पुणे प्रतिनिधी
पी एम पी मध्ये अनेक कर्मचारी उच्चशिक्षित असून ते चालक वाहक म्हणूनच सेवा बजावत आहेत मात्र आता पीएमपी प्रशासनाने या सुशिक्षित कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाचा अनेक कौशल्याचा योग्य वापर करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे अशा उच्चशिक्षित चालक वाहकांना त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार टेबलवरची संधी मिळणार आहे शिक्षणाानुसार पीएमपीच्या आयटी विभाग लिपिक वर्गीय विभाग किंवा थेट मुख्य कार्यालयातील प्रशासकीय कामांमध्ये सामावून घेतले जाणार आहे या निर्णयामुळे अनेक वर्षापासून फक्त बस चालवणे किंवा तिकीट वाटप करणे एवढेच काम करणाऱ्या पण उच्चशिक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे आपल्या शिक्षणाचा खऱ्या अर्थाने संस्थेसाठी उपयोग होणार आणि करिअरला नवी दिशा मिळणार या भावनेने कर्मचारी वर्ग आनंदी झाले आहेत.
*शिक्षणाानुसार मिळणार जबाबदारी*
या नव्या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने बुधवारी येत्या12 तारखेला नोव्हेंबर पीएमपीच्या ताफ्यातील सर्व पदवीधर शिक्षण घेतलेल्या चालक वाहकांना मुख्यालयात असलेल्या हॉलमध्ये बोलावले आहे या दिवशी सकाळी सर्व पात्र कर्मचाऱ्यांना त्यांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेऊन हजर राहण्यास सांगण्यात आले आहे विशेष बाब म्हणजे पी एम पी चे अध्यक्ष पंकज देवरे हे स्वतः या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत या मुलाखती द्वारे कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता आवड आणि प्रशासकीय कामाची जाण तपासून त्यांना त्यांच्या शिक्षणाानुसार योग्य टेबल वरील काम दिले जाणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाचा योग्य सन्मान करणे हेच ध्येय
पीएमपीएमएल एक मोठा परिवार आहे आमच्या अनेक चालक वाहकांनी प्रतिकूल परिस्थिती ही जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे त्यांचे हे ज्ञान व कौशल्य फक्त स्टेरिंग विल किंवा तिकीट मशीन पुरते मर्यादित राहू नये असे आम्हाला वाटते या उपक्रमातून आपण योग्य व्यक्तीला योग्य काम हे तत्व अमलात आणत आहोत जे कर्मचारी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यांना आय टी क्लोरिकल किंवा मुख्यालय कामकाजात संधी दिल्यास त्यांच्या ज्ञानाचा संस्थेच्या प्रशासकीय सुधारण्यासाठी योग्य फायदा होईल यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य तर उंचावेलच पण त्याचबरोबर शासकीय कामकाजालाही अधिक गती आणि अचूकता मिळेल हा संस्थेचा आणि कर्मचाऱ्यांच्या अशा दोघांच्याही हिताचा निर्णय घेतला आहे.























