Homeमहाराष्ट्रस्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाच्या चौकास ​नगरपंचायत सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाच्या चौकास ​नगरपंचायत सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

केज नगरपंचायतचा ऐतिहासिक निर्णय; हारुणभाई व सौ.
सीताताई आणि सर्वपक्षीय नगरसेवकांचे नागरिकांनी मानले आभार

केज/प्रतिनिधी

​केज नगरपंचायतच्या मंगळवार दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील केज-,बीड महामार्गावरील चौकास दिवंगत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे नाव देण्याचा बहुप्रतिक्षित ठराव केज नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत मार्गी लागला. या निर्णयामुळे केज तालुक्यासह शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.
​ लोकभावनेचा आदर करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारूणभाई इनामदार व केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड आणि नगरपंचायतचे सर्व नगरसेवक यांच्यासह नगरपंचायत चे अधिकारी कर्मचारी यांनी
​या चौकास स्व. मुंडे साहेबांचे नाव देण्याचा ठराव सदर बैठकीत एकमताने मंजूर केला. नाव देण्याची मागणी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश एकनाथ मुंडे यांनी सर्वप्रथम केली होती. मुंडे साहेबांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्त, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी पत्रकार प्रकाश मुंडे आणि त्यांच्या सहकारी युवक मित्रांनी हा चौक ‘स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब चौक’ म्हणून स्थापित करण्याची मोहीम सुरू केली होती.
​याच लोकभावनेचा आदर करत, पत्रकार प्रकाश मुंडे यांनी नगरपंचायतकडे रीतसर ठराव दाखल केला होता, ज्याला आजच्या सभेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार हे या ठरावाचे सूचक होते आणि तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
​ आभार आणि कौतुकाचा वर्षाव
​या ऐतिहासिक ठराव मंजुरीमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्वांचे शिक्षक कॉलनी भागातील नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
​या निर्णयासाठी विशेषतः यांचे आभार व्यक्त करण्यात आले: नगराध्यक्षा ​सौ.सिताताई बनसोड , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व या ठरावाचे सूचक हारूणभाई इनामदार, नगरसेवक बालासाहेब जाधव यांच्यासह
​​केज नगरपंचायत मधील सर्वपक्षीय नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी.
​पत्रकार प्रकाश मुंडे यांनी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानताना सांगितले, “आज नगरपंचायतने लोकनेत्यांच्या नावाचा सन्मान करून जनतेच्या मागणीचा आदर केला आहे. यामुळे भावी पिढीला साहेबांचे कार्य प्रेरणा देत राहील.”
​केज-बीड महामार्गावरील या चौकाला स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे नाव मिळाल्याने, केज शहराच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!