Homeमहाराष्ट्र१ जानेवारी रोजी जन्मलेल्या मुलीच्या नावाने १० हजर रुपयांची ठेव ठेवणार -...

१ जानेवारी रोजी जन्मलेल्या मुलीच्या नावाने १० हजर रुपयांची ठेव ठेवणार – हारुणभाई इनामदार

या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून होतेय कौतुक

केज/प्रतिनिधी

केज शहरात दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी जन्म होणाऱ्या मुलीच्या नावे १० हजार रुपयाची ठेव ठेवण्यात येणार आहे. तरी १ जानेवारी रोजी केज शहरात जन्मलेल्या मुलीच्या पालक व नातेवाईकांनी संपर्क करून नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन केज नगरीच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांनी केले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दिनांक १ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केज नगरपंचायत चे गटनेते व जन विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि जीवन शिक्षण संकुलाचे संस्थापक अध्यक्ष हारूणभाई इनामदार वाढदिवस आहे. त्यानिमित्त १ जानेवारीच्या पूर्व संध्येपासून म्हणजेच रात्री १२-०० पासून ते गुरुवारी रात्री ७-०० वाजेपर्यंत केज शहरांमध्ये जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे १० हजार रुपयाची ठेव ठेवण्यात येणार आहे.
दि.१ जानेवारी रोजी हारुणभाई इनामदार यांचा जन्मदिवस आहे, हा जन्मदिवस केज शहरातील व परिसरातील नागरिक विविध उपक्रमानी साजरा करतात आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून हारुणभाई इनामदार यांनी यावर्षी पासुन वाढदिवसाच्या निमित्ताने यावर्षी पासून दि.१ जानेवारी रोजी सर्व जन्मलेल्या मुलींचे नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वागत करण्याच्या उद्देशाने हा संकल्प करण्यात आलेला आहे. १ जानेवारी च्या दिवशी जन्माला येणाऱ्या मुलीच्या पालकांनी बुधवारच्या मध्यरात्री म्हणजेच रात्री १२ ते गुरुवर रोजी सायं. ठीक ७ वाजेपर्यंत जन्माला येणाऱ्या मुलींची नोंदणी करण्यासाठी ९८९००९००७५,९६६५३३३३०५,९०२८३४९९९९,८८५७९२४२९२ या मोबाईल दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करून सदर उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जेष्ठ नेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी केले आहे. नाव नोंदणी ही गुरुवार रोजी सायंकाळी ठीक ७-०० वाजेपर्यंतच चालू राहील त्यानंतर नोंदणी घेण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घेण्यात यावी. १० हजार रुपये हे मुलीच्या नावाने ठेव ठेवीसाठी देण्यात येणार आहेत या मागील उद्देश हा मुलीच्या जन्मदरामध्ये वाढ व्हावी व मुलींना शिक्षणाकरता फायदा व्हावा.सदरील रक्कम ही रोख स्वरूपात दिली जाणार असुन मुलीच्या शिक्षणासाठी तसेच उपयोग होईल मुलीची प्रगती व्हावी या उदात्त हेतूने हा उपक्रम यावर्षी पासुन राबविण्यात येणार आहे असे हारुणभाई इनामदार यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!