Homeमहाराष्ट्रकुंडलीक खांडे पुन्हा एकदा उद्धवसेनेत मातोश्रीवर जाऊन बांधले शिवबंधन

कुंडलीक खांडे पुन्हा एकदा उद्धवसेनेत मातोश्रीवर जाऊन बांधले शिवबंधन

बीड -प्रतिनिधी- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींची रणधुमाळी चालू असताना ठाकरेंच्या शिवसेनेमधून शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले कुंडलीक खांडे पुन्हा एकदा ठाकरे यांच्या शिवसेनेत परतले असून मंगळवारी मातोश्रीवर जात त्यांनी मशाल हाती घेतली आहे. गेल्या काही वर्षात इकडून तिकडे राजकीय उड्या मारणारे खांडे त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
बीड जिल्ह्यात शिवसेनेचे कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या कार्यकर्त्यांपैकी कुंडलीक खांडे हे एक नाव आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर कुंडलिक खांडे यांच्याकडे ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख पद होते परंतु पुढच्या काळात कुंडलिक खांडे यांनी ठाकरे गट सोडून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला होता. मागील विधानसभा निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी कुंडलीक खांडे यांचे मोठे प्रयत्न होते परंतु अनिल जगताप यांना शिवसेनेच्या शिंदे गटाची उमेदवारी मिळाल्यानंतर कुंडलीक खांडे यांनी बंड करत विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती,असे असताना सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे.नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत. याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुंडलीक खांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले आहे. मंगळवारी दुपारी मुंबई येथे मातोश्रीवर हा पक्षप्रवेश झाला यावेळी शिवसेना नेते देसाई माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती होती.

चूक झाली असेल तर माफ करा -खांडे
उद्धव ठाकरेंकडून शिवबंधन बांधून घेतल्यानंतर कुंडलिक खांडे म्हणाले की मागील 22 वर्षापासून मी शिवसैनिक म्हणून काम करतो आहे मागच्या काळात काही कारणावरून मला जिल्हाप्रमुख पदावरून कमी करण्यात आले. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर साहेब मला माफ करा मी अंबादास दादांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा ताकदीने कामाला लागून बीड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपल्या शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही सगळे मिळून आम्ही जिंकून दाखवू असा शब्द देतो अशी प्रतिक्रिया खांडे यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!