Homeमहाराष्ट्रस्वच्छ भारत मिशन अंतर्गत केज नगरपंचायतच्या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केज नगरपंचायतच्या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ

नागरिकांनी स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे-डॉ.हारुणभाई इनामदार

केज/प्रतिनिधी

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केज नगरपंचायतच्या वतीने केज शहरातील सर्व प्रभागातील स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यास आली आहे,दररोज एक प्रभाग याप्रमाणे स्वच्छता करण्यात येणार आहे सदरची स्वच्छता मोहीम ही संपूर्ण एक महिना कार्यरत राहणार आहे. तरी केज शहरातील नागरिकांनी स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन गटनेते डॉ. हारूणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांनी केले आहे. या स्वच्छता मोहिमेची सुरुवात गुरुवार रोजी शहरातील जय भवानी चौक येथून करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्व नागरिकांना सादरीकरणातून दाखवले. गुरुवार रोजी केज नगरपंचायतच्या वतीने स्वच्छ भारत मिशनचे सुरुवात करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेस जय भवानी चौकापासून सुरुवात करून धारूर रोड स्वच्छ करण्यात आला या कार्यक्रमात साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांनी सहभाग नोंदवला. या स्वच्छता मोहिमेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केज नगरपंचायतचे गटनेते डॉ.हारुणभाई इनामदार व केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांनी सहभागी होऊन स्वच्छता केली.
यावेळी जेष्ठ नेते डॉ.हारूणई इनामदार नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड, नगरसेवक बाळासाहेब गाढवे,अमजद सय्यद,स्वच्छता निरीक्षक रमाकांत सोनकांबळे, स्वच्छता अभियंता जगदीश हेंबाडे, शेअर समन्वयक गोविंद तपसे, लांडगे साहेब, वनवे साहेब, स्वच्छता मुकादम भीमा शिंदे, महादेव लांडगे यांच्यासह साने गुरुजी विद्यालयाचे शिक्षक वृंद व विद्यार्थी आणि केज नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी सहभागी होते. यावेळी माध्यमांश बोलताना नगराध्यक्षा डॉ.सौ‌.सीताताई बनसोड यांनी नागरिकांना आवाहन केले की, शहरातील सर्व प्रभागात नगर पंचायतीच्या माध्यमातून पूर्ण एक महिना ‌स्वछता राबवण्यात येत आहे.तरी सुजाण नागरिकांनी आपल्या घरातील, परिसरातील व सार्वजनिक कचरा जमा करून घंटा गाडीमध्ये टाकावा. घरातील कचरा हा आपल्या परिसरातील मुख्य ठिकाणी व नाली मध्ये टाकू नये. या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे.
यावेळी बोलताना जेष्ठ नेते डॉ. हारुणभाई इनामदार यांनी म्हटले की, या स्वच्छता मोहिमेमध्ये शहरातील सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आहे. तसेच शहरातील नागरिकांनी व विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले शहर सुंदर शहर ठेवण्यासाठी सहकार्य करावे. आम्ही प्रत्येक सामाजिक संघटना, रोटरी क्लब, शाळा, महाविद्यालय यांना पत्र देऊन विनंती केली की, आपण या स्वच्छता मोहित सहभागी होऊन आपले शहर सुंदर शहर करण्यासाठी नगरपंचायतला सहकार्य करावे. नागरिकांनी, छोटे व्यावसायिक, व्यापारी यांनी आपला कचरा उघड्यावर व रिकाम्या ठिकाणी, रस्त्यावर आणि नालीत न टाकता तो कचरा घंटागाडीत टाकावा, जर एखाद्या ठिकाणी घंटागाडी येत नसेल तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जेष्ठ नेते डॉ.हारुणभाई इनामदार यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!