Homeमहाराष्ट्रधानोरा येथील भिल्ल वस्तीवर मदतीचा हात; जावेद कुरेशी यांच्याकडून शैक्षणिक साहित्य व...

धानोरा येथील भिल्ल वस्तीवर मदतीचा हात; जावेद कुरेशी यांच्याकडून शैक्षणिक साहित्य व कपड्यांचे वाटप

बीड/प्रतिनिधी

धानोरा येथील भिल्ल समाजाच्या वस्तीवर मदतीचा हात म्हणून जावेद कुरेशी यांच्याकडून शैक्षणिक साहित्य व कपड्यांचे वाटप केले आहे.
​धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने वस्तीवरील पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधल.
​बीड तालुक्यातील धानोरा येथील भिल्ल समाजातील वस्तीवर राहणाऱ्या भटके विमुक्त समुदायाच्या समस्या जाणून घेत, धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला. प्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व जावेद कुरेशी यांनी या वस्तीवरील मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य, कपडे आणि महिलांना साड्यांचे वाटप केले. यावेळी वस्तीवरील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
जावेद कुरेशी यांच्या या उपक्रमामुळे ​मुले आणि महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. या वस्तीवरील नागरिकांनी धर्मराज सेवाभावी संस्थेचे व जावेद कुरेशी यांचे आभार मानले. धानोरा येथील भिल्ल समाजाच्या वस्तीवरील बहुतांश लोक हे ऊसतोड कामगार असून, रोजगारासाठी त्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते. या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी जावेद कुरेशी यांनी पुढाकार घेतला. वस्तीवरील सर्व लहान मुलांना शालेय साहित्य आणि नवीन कपडे देण्यात आले. तसेच वस्तीवरील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे वस्तीवर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
​पाणीटंचाईची भीषण समस्या या वस्तीवर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. येथील महिलांना कोसो कोसो दूर वन वन करत पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागते. ऊसतोडणीसाठी बाहेरगावी जावे लागत असल्याने मुलांच्या संगोपनाचा आणि प् पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या वस्तीवरील नागरिक हे शासनाच्या विविध योजने पासून व लाभापासून वंचित आहेत. धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या प्रश्नावर सातत्याने काम करत असून, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
​वंचितांच्या सेवेसाठी संस्था तत्पर धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गेल्या अनेक दिवसांपासून भिल्ल समाजासाठी व इतर समुदायातील मुलांचे शिक्षण आणि आरोग्य यावर काम करत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वस्तीवरील समस्या जावेद कुरेशी यांना सांगितल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी धावून येण्याचे मान्य केले.
​”या समाजातील मुलांच्या हातात पाटी-पेन्सिल असावी आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, या भावनेतून आम्ही ही छोटीशी मदत केली आहे. भविष्यातही या वस्तीसाठी आम्ही सहकार्य करत राहू. जावेद कुरेशी (देणगीदार)
​या उपक्रमासाठी धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे कार्यकर्त्या प्रियंका खोब्रागडे, रुपाली कुटे जिव्हाळा केंद्राचे राजू वंजारे, अभिजित वैद्य, छाया सरवदे आणि कांबळे सर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शितल लांडगे यांच्यावतीने क्रांतीनगर भागामध्ये घेण्यात आलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद

केज/ प्रतिनिधी दि.२४ जानेवारी रोजी क्रांतीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष सौ शितलताई लांडगे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात मकर संक्रांती निमित्त हळदीकुंकू संपन्न...

शहरात जनविकास फाउंडेशनच्या हळदी-कुंकू महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केज/प्रतिनिधी केज शहरांमध्ये जनविकास फाउंडेशन आयोजित हळदी- कुंकू महोत्सवाचे आयोजन हे बुधवार रोजी पासून करण्यात आले आहे. गुरुवार रोजी शहरातील महात्मा फुले नगर येथील जे.के.फंक्शन हॉल...

प्रा.रमेश सरवदे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले

अंबाजोगाई/प्रतिनिधी १८जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, आरंभ बँक्वेट हॉल परेल मुंबई येथे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला....

पुरोगामी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहिर बीड जिल्हा अध्यक्ष रणजित घाडगे तर केज तालुका...

केज | प्रतिनिधी "जय भारत" हे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्रासह संपुर्ण भारत देशात गेल्या आठ वर्षापासून पत्रकारांसाठी आणि पिडित,...

error: Content is protected !!