केज/प्रतिनिधी
महाराष्ट्रात झालेल्या बीएमसीसह महानगर पालिका व नगर पालिकां च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी विचारधारेच्या तिच्या सहयोगी घटक पक्षांना प्रचंड बहुमताने मिळालेल्या विजयाबद्दल समस्त महाराष्ट्र वासीयां सह देशवासीयांनी आनंद व्यक्त केला आहे.या यशा बद्दल सर्वांना हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या विजयामागे देवतुल्य कार्यकर्त्यांची अथक मेहनत,शिस्तबद्ध संघटन व निष्ठावान समर्पण महत्त्वाचे ठरले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच विकास,सुशासन व राष्ट्रहिताच्या बाजूने स्पष्ट जनादेश देणाऱ्या नागरिकांचे आभार मानण्यात आले आहेत.
या निवडणूक निकालातून जात-धर्माच्या आधारे समाजात फूट पाडणाऱ्या राजकारणाला मतदारांनी ठाम नकार दिल्याचा संदेश मिळतो,असेही नमूद करण्यात आले. काँग्रेस,शिवसेना(उबाठा गट),राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राजकारण तसेच समाजवादी पार्टी यांना अपेक्षित यश न मिळाल्याने महाराष्ट्राला विकासाभिमुख व स्थिर नेतृत्वाची अपेक्षा असल्याचे अधोरेखित झाले आहे.ही विजयगाथा तुष्टीकरण व नकारात्मक राजकारणाच्या पराभवाची असून राष्ट्रवाद,सुशासन आणि जनसेवेच्या विचारांची विजयपताका असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या ऐतिहासिक विजया बद्दल भारतीय जनता पार्टी व तिच्या सर्व सहयोगी घटक पक्षांचे अभिनंदन करत जय लोकतंत्र,जय महाराष्ट्र असा जयघोष करण्यात आला आहे असे भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शांत प्रकाशजी जाटव यांनी म्हटले आहे.भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब घोडके,महाराष्ट्र सचिव धनंजय कुलकर्णी, मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील यांच्या सह कार्यकर्त्यांनी महायुतीचे व मतदार बंधु भगिनी यांचे आभार मानले आहेत.
























