अहिल्या नगर प्रतिनिधी – गणेश रणशिंग
अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून राहुरी हद्दीतील या मार्गावर आतापर्यंत खूप लोकांचे बळी गेले असून या समस्येबाबत जनहित याचिकेची दखल घेत संभाजीनगर खंडपीठाने प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत याप्रकरणी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संबंधित ठेकेदारांची मांडणी सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 हा जिल्ह्याची प्रमुख जीवन रेखा आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून वाहतूक होत असते .तीन दशकापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. तरी खूप मोठ्या प्रमाणावर निधी खर्चूनही हा महामार्ग अजून पर्यंत पूर्णपणे दुरुस्ती झालेला नाही विशेषता पावसाळ्याच्या काळात या रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडण्याचे प्रमाण होत असते त्यामुळे खूप लोकांना यामध्ये जीव गमावा लागलेला आहे तरी या महत्त्वाच्या आणि दीर्घकाळ असलेल्या प्रलंबित समस्या बाबत राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी अॅड शिवराज कडू पाटील यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे.
याचिका कर्ते दादासाहेब पवार यांनी या महामार्गाबाबत धोकादायक स्थितीबद्दल शासकीय विभाग व संबंधित ठेकेदारांकडे निवेदन सादर केली आहेत यामध्ये अपघात ग्रस्त ठिकाणी धोक्यांचे सूचना फलक लावणे स्पॉट संदर्भात जनजागृती करणे मद्यपान करून वाहन चालवण्यावर कारवाई करणे घडलेल्या अपघातांची सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदार संबंधित लोकप्रतिनिधींवर सदोष मनुष्यवदाच्या जबाबदारीची कारवाई अवजड वाहतूक कोपरगाव अहिल्यानगर येथून पर्यायी मार्गाने वळवणे अशा प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश केलेला आहे.
या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलेली असून जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन महामार्ग प्रशासन संबंधित ठेकेदारांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिलेले असून. या महामार्गावर राहुरी कृषी विद्यापीठ अहिल्यानगर शहर शिर्डी शनिशिंगणापूर यासारखी जागतिक दर्जाची तीर्थक्षेत्र असून तालुक्याचे मुख्य शहरे या महामार्गालगत आहेत त्यामुळे बाहेरून येणारे विद्यार्थी भाविक या महामार्गावरून ये जा करीत असतात मात्र महामार्गाच्या दुर्व्यवस्थेमुळे यांनी प्रचंड त्रासाला सामोरे गेले आहेत या अपघातांमध्ये घरातील कमावते पुरुष तरुण विद्यार्थी बळी पडत असल्याने अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत या गंभीर विषयाकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे याप्रकरणी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड शिवराज कडू पाटील शासनातर्फे अॅड निखिल टेकाळे तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे अॅड सुहास उरगुंडे यांनी आपली बाजू मांडली





















