केज/प्रतिनिधी
दरवर्षी केज येथे येडेश्वरी फाउंडेशन च्या वतीने निमित्त उपक्रम राबवले जातात अनेक महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून एकीकरण करून त्यांना स्वतःच्या पायावरती सक्षम राहण्याकरिता सदैव येडेश्वरी फाउंडेशन महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं या येडेश्वरी फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळी महिलांकरिता प्रशिक्षण घेतले जातात मग त्यामध्ये शिलाई मशीन कोर्स असेल ब्युटी पार्लर कोर्स असेल किंवा केक बनवणे अशा विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध कसा होईल याबाबतीत सदैव
येडेश्वरी फाउंडेशन प्रयत्नशील असतं आज येडेश्वरी फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आदरणीय सौ सारिका ताई बजरंग सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष खासदार येडेश्वरी फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमात कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आले त्याचबरोबर विविध कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच बचत गटातील महिलांनी बनवलेल्या विविध पदार्थ, वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन शितलताई लांडगे यांनी केले तर प्रमुख उपस्थितीत प्रियदर्शनी बँकेच्या संचालिका मीनाक्षीताई श्रीधर भवर ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीडच्या जिल्हाध्यक्ष नसरीन भाभी बागवान, जिल्हा उद्योग केंद्र तथा मिटकॉन चे प्रोजेक्ट मॅनेजर व्हिटी चव्हाण सर , प्रोजेक्ट कॉर्डिनेटर शिंदे सर, पंचायत समिती सदस्य आदरणीय पिंटू भैया ठोंबरे, भाऊसाहेब गुंड, शरीफ भैय्या सय्यद,सरपंच मनीषा ताई कणसे , विमल ताई जोगदंड, अर्चना इंगळे, सुनिता डबरे, तसलीम इनामदार ,प्रियंका शिंदे, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या हा कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा टोपे, माया कसबे, रूपाली ताई शिंनगारे ,मंगल जाधव , धनश्रीताई मिटकरी यांनी मेहनत घेतली .

















