केज/प्रतिनिधी
केज शहरातील विविध भागांमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
केज शहरातील भीम नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले नगर, क्रांतीनगर सह शहरातील अनेक ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूपदीपाने पूजन करून उपस्थित मान्यवरांनी व बौद्ध अनुयायांनी विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड, गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेविका सौ. पद्मिनी अक्का शिंदे, गटनेते भाऊसाहेब गुंड, वंचितचे ज्येष्ठ नेते धनराज सोनवणे, युवा नेते लखन हजारे, शरद धीवार, पत्रकार तात्या गवळी, नंदकुमार मस्के सर, सुभाष हजारे,अमोल हजार, प्रवीण मस्के, आरपीआयचे दीपक कांबळे, धीरज मस्के, विवेक बनसोड, रोहित कसबे, बाबुराव गालफडे, राहुल इनकर, सुहास समुद्रे, संदिपान गायकवाड, शिनगारे मामा, धनवे सर, अशोक धीवार, किरण जोगदंड, कागदे साहेब, सोपने साहेब, महादेव गायकवाड, अशोक गायकवाड, नितीन धीवर, अनिल डोंगरे, शितल लांडगे, प्रियंका शिंदे, प्रमिला मस्के, लता वाघमारे, सुमन घुमरे, महानंदा गायकवाड, संगीता सिरसट, ज्योती सिरसट, विमल जोगदंड यांच्यासह सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर व बौद्ध उपासक-उपासिका बालक- बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























