नागरिकांनी स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे-डॉ.हारुणभाई इनामदार
केज/प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केज नगरपंचायतच्या वतीने केज शहरातील सर्व प्रभागातील स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यास आली आहे,दररोज एक प्रभाग याप्रमाणे स्वच्छता करण्यात येणार आहे सदरची स्वच्छता मोहीम ही संपूर्ण एक महिना कार्यरत राहणार आहे. तरी केज शहरातील नागरिकांनी स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन गटनेते डॉ. हारूणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांनी केले आहे. या स्वच्छता मोहिमेची सुरुवात गुरुवार रोजी शहरातील जय भवानी चौक येथून करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्व नागरिकांना सादरीकरणातून दाखवले. गुरुवार रोजी केज नगरपंचायतच्या वतीने स्वच्छ भारत मिशनचे सुरुवात करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेस जय भवानी चौकापासून सुरुवात करून धारूर रोड स्वच्छ करण्यात आला या कार्यक्रमात साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांनी सहभाग नोंदवला. या स्वच्छता मोहिमेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केज नगरपंचायतचे गटनेते डॉ.हारुणभाई इनामदार व केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांनी सहभागी होऊन स्वच्छता केली.
यावेळी जेष्ठ नेते डॉ.हारूणई इनामदार नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड, नगरसेवक बाळासाहेब गाढवे,अमजद सय्यद,स्वच्छता निरीक्षक रमाकांत सोनकांबळे, स्वच्छता अभियंता जगदीश हेंबाडे, शेअर समन्वयक गोविंद तपसे, लांडगे साहेब, वनवे साहेब, स्वच्छता मुकादम भीमा शिंदे, महादेव लांडगे यांच्यासह साने गुरुजी विद्यालयाचे शिक्षक वृंद व विद्यार्थी आणि केज नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी सहभागी होते. यावेळी माध्यमांश बोलताना नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांनी नागरिकांना आवाहन केले की, शहरातील सर्व प्रभागात नगर पंचायतीच्या माध्यमातून पूर्ण एक महिना स्वछता राबवण्यात येत आहे.तरी सुजाण नागरिकांनी आपल्या घरातील, परिसरातील व सार्वजनिक कचरा जमा करून घंटा गाडीमध्ये टाकावा. घरातील कचरा हा आपल्या परिसरातील मुख्य ठिकाणी व नाली मध्ये टाकू नये. या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे.
यावेळी बोलताना जेष्ठ नेते डॉ. हारुणभाई इनामदार यांनी म्हटले की, या स्वच्छता मोहिमेमध्ये शहरातील सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आहे. तसेच शहरातील नागरिकांनी व विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले शहर सुंदर शहर ठेवण्यासाठी सहकार्य करावे. आम्ही प्रत्येक सामाजिक संघटना, रोटरी क्लब, शाळा, महाविद्यालय यांना पत्र देऊन विनंती केली की, आपण या स्वच्छता मोहित सहभागी होऊन आपले शहर सुंदर शहर करण्यासाठी नगरपंचायतला सहकार्य करावे. नागरिकांनी, छोटे व्यावसायिक, व्यापारी यांनी आपला कचरा उघड्यावर व रिकाम्या ठिकाणी, रस्त्यावर आणि नालीत न टाकता तो कचरा घंटागाडीत टाकावा, जर एखाद्या ठिकाणी घंटागाडी येत नसेल तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जेष्ठ नेते डॉ.हारुणभाई इनामदार यांनी केले.
























