रमेश तात्या गालफाडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे अल्प उपहार व फळ वाटप
केज /प्रतिनीधी
बहुजन विकास परिषद व रमेश तात्या गालफडे सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांचा वाढदिवस केज शहरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने रमेश तात्या गालफाडे यांच्या वाढदिवसानिमित्त बोबडेवाडी येथे असणाऱ्या स्वामी समर्थ वृद्धाश्रम या ठिकाणी फळवाटप करून साजरा करण्यात आला तसेच आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची ही जयंती होती तसेच स्वामी विवेकानंद यांचीही जयंती या दोन्ही जयंती सुद्धा या ठिकाणी साजरा करण्यात आले तसेच शिक्षणाचे देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून पुढील मनोगत सर्वांनी व्यक्त केले कुठलाही अनुदान नसताना महादेव( बापू )कराड हे सध्या स्वखर्चाने हे वृद्ध आश्रम चालवतात कुठल्याही शासनाची सवलत नाही किंवा कसलाही आधार नसताना वृद्धआश्रम चालवतात या वृद्धाश्रमात एकूण नऊ महिला व चार पुरुष आहेत यांचा सर्व खर्च दवाखान्याचा असेल किंवा इतर कुठलाही खर्च महादेव (बापू) कराड हे स्वता करतात. कला क्रीडा विश्व समितीच्या वतीनेआज या वृद्धाश्रमामध्ये रमेश तात्या गालफाडे यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कला क्रीडा विश्व समितीचे अनिल वैरागे, मुनीर कुरेशी, बिबीशन ठोंबरे, पत्रकार तात्या गवळी, धनराज भालेराव, उमाकांत बोधने सर, सिंधुताई मुळे, सुनिता ताई बोधने, तसेच गावकरी मंडळी हे देखील उपस्थित होते.
























