Homeमहाराष्ट्रबीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकांमध्ये समविचारी पक्ष संघटनेचा...

बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकांमध्ये समविचारी पक्ष संघटनेचा सक्षम पर्याय देण्यासाठी लवकरच बैठक – भाई मोहन गुंड

केज/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यासह राज्यातील कार्यकाळ संपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भांडवलदार आणि प्रस्थापित पक्षांविषयी सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास उरलेला नाही, अशा भावना व्यक्त करत शेतकरी कामगार पक्षाचे नेते व राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड यांनी बीड जिल्ह्यातील समविचारी पक्ष संघटनांच्या प्रमुखांसमवेत बैठक घेऊन जिल्ह्यात एक सक्षम पर्याय उभा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
भाई गुंड म्हणाले की, भांडवलदार व प्रस्थापित पक्ष केवळ स्वतःच्या संस्था, कारखाने आणि राजकीय अस्तित्व टिकविण्यापुरतेच कार्य करतात. त्यांनी आजपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्ते व तरुणांचा कधीही विचार केलेला नाही. त्यामुळे या वेळी जिल्ह्यातील तरुणांना पुढे आणण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज होण्यासाठी समविचारी पक्ष आणि संघटनांना एकत्र करून जिल्ह्यात नवा राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सर्व जागा लढविण्याच्या दृष्टीने लवकरच समविचारी पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत सर्वांनुमते पुढील रणनीती ठरवून जिल्ह्यात शेतकरी, कामगार, श्रमजीवी वर्ग आणि सर्वसामान्य जनतेचा राजकीय आवाज बळकट करण्याचा संकल्प केला जाईल.
बीड जिल्ह्यात शांत, संयमी आणि विचारप्रधान राजकारणाचा पाया मजबूत करण्यासाठी ही आघाडी सक्षम पर्याय ठरणार असल्याचे भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

चौकट
कुठल्या ही प्रस्थापित पक्षावर सामान्यचा विश्वास राहीला नाही म्हणून, जिल्ह्यातील समविचारी पक्ष संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन भाई मोहन गुंड यांनी केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!