Homeमनोरंजनशहरात जनविकास फाउंडेशनच्या हळदी-कुंकू महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शहरात जनविकास फाउंडेशनच्या हळदी-कुंकू महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केज/प्रतिनिधी

केज शहरांमध्ये जनविकास फाउंडेशन आयोजित हळदी- कुंकू महोत्सवाचे आयोजन हे बुधवार रोजी पासून करण्यात आले आहे.
गुरुवार रोजी शहरातील महात्मा फुले नगर येथील जे.के.फंक्शन हॉल येथे हळदी-कुंकू महोत्सव संपन्न झाला. या जनविकास फाउंडेशन आयोजित हार्दिक कुंकू महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या कार्यक्रमाला ६५० ते ७०० महिला सहभागी होऊन हळदी-कुंकू व अल्पोहाराचा लाभ घेतला आहे.
मागील पाच वर्षापासून केज शहरात महिलांसाठी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख व जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. हारुणभाई इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांच्या नेतृत्वाखाली हळदी-कुंकू महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना विचाराची देवाण-घेवाण करता यावी, महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, महिलांच्या अडीअडचण समजावून घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, महिलांनी सक्षम बनवून स्वतःच्या पायावर उभा टाकून महिलांनी स्वतःचे छोटे-मोठे उद्योग उभारून त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यात यावा हा आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या महिला आघाडीच्या उषाताई मुंडे, नगरसेविका सौ पद्मिनी आक्का शिंदे, ॲड. अनिताताई मुंडे, सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई साळवे, प्रमिताताई कांबळे,महानंदा गायकवाड, रत्नमालाताई धिवार,प्रमिला मस्के, विमलताई जोगदंड, हजारे ताई यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना उषाताई मुंडे म्हणाले की, आमचे बंधू हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सीताताई बनसोड या सतत महिलांसाठी काम करत आहोत. अशा कार्यक्रमामुळे महिलांना प्रेरणा मिळते, केज शहरांमध्ये महिलांसाठी विविध प्रकारचे असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. पुढे बोलताना उषाताई मुंडे म्हणाल्या की, नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांनी व त्यांच्या सर्व सहकारी नगरसेवकांनी केज शहरांमध्ये चांगल्या प्रकारची विकास कामे केलेले आहेत. असाच केज शहराचा विकास होण्यासाठी पुढील काळामध्ये देखील त्यांना सर्वांनी साथ देण्याची गरज आहे.
यावेळी प्रमिताताई कांबळे यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. पुढे बोलताना सौ‌.कांबळे म्हणाल्या की, नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांचे काम कौतुकास्पद आहे. महिलांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेणे काळाची गरज आहे. सीताताई बनसोड यांचा प्रवास हा संघर्षमय आहे त्या एक कार्यकर्त्या म्हणून काम करत आल्या आणि नगराध्यक्षा ते डॉक्टरेट पदवी मिळून आज सीताताई बनसोडे या डॉक्टर झालेल्या आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून महिलांना संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड म्हणाल्या की, आमचे नेते हारुणभाई इनामदार हे सतत राजकीय क्षेत्र व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी जपत आहेत म्हणून ते लाडक्या बहिणीला भावाची तिळगुळाच्या माध्यमातून भेट देऊन बहिणी समवेत चर्चा करून हितगुज साधावे म्हणून हळदी-कुंकू महोत्सवाचे आयोजन हे मागील पाच वर्षापासून सातत्य पणे करत आहोत. केज शहरात मागील दोन दिवसापासून जनविकास फाउंडेशन आयोजित हळदी-कुंकू महोत्सवाचा कार्यक्रम मोठा उत्सवात चालू आहे. या कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे आम्ही भारावून गेलो आहोत. पुढे बोलताना बनसोड म्हणाल्या की, लवकरच जनविकास फाउंडेशनच्या माध्यमातून केज शहरांमध्ये महिलांसाठी विविध उद्योग चालू करणार आहोत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बोबडे मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार वर्षा राख यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जन विकास फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

चौकट:-

जनविकास फाउंडेशन आयोजित हळदी-कुंकू महोत्सव या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केज नगरपंचायतचे गटनेते हारुणभाई इनामदार यांनी भेट देऊन महिलांशी संवाद साधून महिलांच्या अडीअडचणी व प्रश्न जाणून घेऊन चर्चा केली.
केज शहरातील सर्व प्रभागातील माझ्या बहिणींना हळदी-कुंकू महोत्सवाच्या माध्यमातून हितगुज साधता यावे व विचारांची देवाण-घेवाण व्हावी यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षापासून कार्यक्रम घेत आहोत. यावर्षीच्या हळदी,कुंकू महोत्सवास मोठ्या संख्येने माझ्या शहरातील सर्व बहिणीनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

केज येथे प्रा.माणिकराव आनंदगावकर यांच्या ‘गोडवा’ हायकू काव्य संग्रहाचे थाटात प्रकाशन

गोडवा'काव्यसंग्रहातून घडते सामाजिकतेचे दर्शन,अल्पाक्षरी हायकू प्रकारातून समाज मनाचा वेध घेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न - डॉ.दीपकराव कासराळीकर केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र,सेवानिवृत्त प्राध्यापक आणि कवी माणिकराव आनंदगावकर...

error: Content is protected !!