Homeउद्योगएफआरपी' पेक्षाही जास्त भाव देणार; खा.सोनवणेंनी ठणकावून सांगितले

एफआरपी’ पेक्षाही जास्त भाव देणार; खा.सोनवणेंनी ठणकावून सांगितले

केज: प्रतिनिधी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवीन क्रांती यावी, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, असा हेतू डोळ्यासमोर ठेवून येडेश्वरी साखर कारखान्याची उभारणी केली. आजपर्यंत सर्वाधिक ऊसदर देण्याचे काम येडेश्वरी कारखान्याने केलेले असून यावर्षी देखील एफआरपीपेक्षा अधिकचा दर देऊ, असा शब्द खा.बजरंग सोनवणे यांनी उसउत्पादक शेतकऱ्यांना दिला.

येडेश्वरी साखर कारखाना लि.युनिट नं.१, आनंदगाव (सा.), ता. केज येथील सन २०२५-२६ च्या १२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी खा.सोनवणे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, गेल्या ११ हंगामांपासून येडेश्वरी साखर कारखाना सातत्याने प्रगतीचा ध्यास घेत कार्यरत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि कारखान्याच्या कार्यक्षम व्यवस्थापनामुळे आज कारखान्याने उत्पादन, कार्यक्षमता आणि शेतकरी हितसंबंध या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवले आहे. कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना वेळेवर ऊस गाळप, योग्य दर, सेंद्रिय शेती व नवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले. आगामी काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी साखर, इथेनॉल, वीज उत्पादन आणि उपउद्योग यांच्या माध्यमातून आणखी नवे प्रकल्प राबविण्याचा कारखान्याचा संकल्प आहे. आजवर येडेश्वरी कारखान्याने सर्व शेतकरी बांधवांचा ऊस वेळेत घेवून जाण्याचे काम केले आहे. यावर्षी देखील सर्व शेतकऱ्यांचा हा कारखाना घेवून जाईल. शेतकऱ्यांनी कोणतीही अडचण आल्यास कारखान्यावर यंत्रणेशी संपर्क करावा, असे आवाहनही खा.सोनवणे यांनी केले. या शुभारंभ प्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, नेतेमंडळी, विभागप्रमुख, खातेप्रमुख, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००

ऊसउत्पादकांना बोनसही देणार

येडेश्वरी साखर कारखान्याने आजवर बीड जिल्ह्यात सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावर्षीही आपण चांगला दर देणार आहोतच, पण या कारखान्यावर माझ्या शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असून यावर्षी आपण ऊसउत्पादकांना बोनस देण्याचा देखील विचार करत आहोत. शिवाय यापुढे कायमस्वरूपी शेतकऱ्यांना बोनस दिला जाईल, असेही खा.बजरंग सोनवणे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

error: Content is protected !!