Homeमहाराष्ट्रदर्पण दिनानिमित्त पत्रकार बांधवांकडून केज येथील वृद्धश्रामात स्नेहभोजन स्वाभिमानी पत्रकार संघाच्या...

दर्पण दिनानिमित्त पत्रकार बांधवांकडून केज येथील वृद्धश्रामात स्नेहभोजन स्वाभिमानी पत्रकार संघाच्या स्तुत्य उपक्रमाने आजी आजोबा गहिवरले!* वृद्धाश्रम चालक महादेव बापू कराड यांचा पत्रकारांकडून सत्कार

केज/प्रतिनीधी

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे वृद्धाश्रमातील आजी-आजोबा यांच्या समवेत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करून स्वामी समर्थ वृद्धाश्रमातील आजी- आजोबा आणि पत्रकार बांधवांना स्नेह भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला क्रीडा विश्व समितीचे केज तालुका अध्यक्ष तथा पत्रकार अनिल बापू वैरागे तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार महादेव काळे, कला क्रीडा विश्व समितीचे उपाध्यक्ष मुनीर कुरेशी, पत्रकार बाळासाहेब जाधव, स्वामी समर्थ वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष महादेव बापू कराड यांची प्रमुख उपस्थिती होती,
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या व पत्रकार बांधवांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूप-दिपानी पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने स्वामी समर्थ वृद्धाश्रमातील आजी-आजोबा यांचे प्रतिनिधी म्हणून गोपीनाथ पंचाळ या आजोबांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व उपस्थित मान्यवर आणि पत्रकार बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
स्वाभिमानी पत्रकार संघाच्या स्थापनेपासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी ६ जानेवारी रोजी रुग्णांना फळाचे वाटप व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य, फळांचे वाटप केले जाते. परंतु यावर्षी स्वाभिमानी पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांनी रुग्णांना फळांचे वाटप व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि फळांचे वाटप न करता केज शहरा पासूनच जवळ बोबडेवाडी रोड वरील स्वामी समर्थ वृद्ध आश्रम येथे आजी-आजोबा यांना भोजनदान करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्याचे ठरवले. स्वामी समर्थ वृद्ध आश्रम हे गेल्या तीन ते चार वर्षापासून महादेव (बापू) कराड हे चालवतात परंतु या वृद्धाश्रमास शासनाचे अनुदान नाही. या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना मदत व्हावी. आणि त्यांचे सुखदुःख जाणून घेण्यासाठी व महादेव कराड यांना सहकार्य लाभावे या उद्देशांनी स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्येष्ठ पत्रकार महादेव काळे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित असणारे
मुनीर कुरेशी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, आजी आजोबा यांना रस्त्यावर सोडणाऱ्या मुलांच्या शरीरात कदाचित हृदय नावाचा अवयवच नसेल म्हणून वृध्दश्राम स्थापन करण्यात येत असून या वृध्दश्रामात आजी आजोबांना कोणतीही अडीअडचण किंवा गरज भासुद्या आम्ही सर्व पत्रकार मदतीला धावुन येवू. असे म्हणाले.
यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष महादेव (बापू)कराड यांनी पत्रकार बांधवासमोर आजी-आजोबांच्या व्यथा मांडल्या, पुढे बोलताना कराड म्हणाले की, गेलेल्या तिन वर्षांपासून कोणतेही शासकीय अनुदान नसताना स.वखर्चातुन मी आणि माझी पत्नी हा वृध्दाश्रम चालवत आहोत. आपल्यासारख्या दानशुर व्यक्तींनी आत्तापर्यंत भरपुर मदत केलेली आहे. करत आहेत. आणि आज पत्रकार बांधवांनी या ठिकाणी येऊन बाळशास्त्री जांभेकर यांची जय़ती आमच्या सोबत साजरी केली. आम्हा सर्वांना भोजन दान दिले त्याबद्दल त्यांनी पत्रकार बांधवांचे आभार मानले.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी बोलताना अनिल वैरागे यांनी म्हटले की, ज्या आई-वडिलांनी मुलांना लहानाचे मोठे करून त्यांना शिक्षण देऊन त्यांनी मुलांच आयुष्य घडवले अशा आई-वडिलांनाच काही मुलांनी वाऱ्यावर सोडले परंतु त्यांना आधार देण्याचे काम हे बापू कराड करत आहेत. आज स्वाभिमानी पत्रकार संघाच्या आमच्या पत्रकार बांधवांनी जो कार्यक्रम घेतला आहे तो कार्यक्रम नावीन्यपूर्ण व वाखण्य आहे. या वृद्धाश्रमात असेच कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. मीही आमच्या कला विश्व क्रीडा समितीच्या वतीने लवकरच कार्यक्रम घेणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार तात्या गवळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार पत्रकार वसंत सोनवणे यांनी मानले.
यावेळी जेष्ठ पत्रकार मधुकर (दादा)सिरसठ, महादेव गायकवाड, संतोष गालफाडे, महादेव काळे, अनिल वैरागे, बाळासाहेब जाधव, स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष तात्या गवळी, उपाध्यक्ष विकास सोनवणे, सचिव वसंत सोनवणे, कोषाध्यक्ष विवेक बनसोड, विनोद पवार, संजय खळगे, बाळासाहेब गलांडे, राहुल इनकर, विकास देशमुख, वैभव माचवे, नखाते सर यांच्यासह वृद्ध आश्रमातील आजी-आजोबा व पत्रकार बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप हा वृद्ध आश्रमातील आजी-आजोबा यांच्या समवेत स्नेहभोजनाचा अस्वाद घेवुन करण्यात आला. यावेळी केज येथील पत्रकार बांधवांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
त्यामुळे या वर्षीचा दर्पण दिन अर्थात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती वृध्दाश्रमात साजरी झाल्याने सर्व पत्रकार बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. तर स्वाभिमानी पत्रकार संघाने घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

केज येथे प्रा.माणिकराव आनंदगावकर यांच्या ‘गोडवा’ हायकू काव्य संग्रहाचे थाटात प्रकाशन

गोडवा'काव्यसंग्रहातून घडते सामाजिकतेचे दर्शन,अल्पाक्षरी हायकू प्रकारातून समाज मनाचा वेध घेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न - डॉ.दीपकराव कासराळीकर केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र,सेवानिवृत्त प्राध्यापक आणि कवी माणिकराव आनंदगावकर...

error: Content is protected !!