Homeमहाराष्ट्रकेज पंचायत समितीत वर्ककोडचा घोटाळा उघड – बीडीओ च्या मर्जीने नरेगात नियमबाह्य...

केज पंचायत समितीत वर्ककोडचा घोटाळा उघड – बीडीओ च्या मर्जीने नरेगात नियमबाह्य ‘प्रमा’ ए.पी.ओ ची सही नाही, तरीही कोट्यवधींची नरेगा कामे मंजूर!

केज:प्रतिनिधी
केज पंचायत समिती येथील नरेगा विभागात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, नरेगा प्रमुख सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (ए पी ओ) यांच्या टिपणीवर परवानगी अथवा स्वाक्षरी न घेता थेट प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश  काढून वर्ककोड तयार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार गटविकास अधिकारी (बीडीओ) यांच्या थेट संमतीने व मनमानी कारभारातून सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. नियम व शासन आदेशांना धाब्यावर बसवून कामकाज केल्यामुळे नरेगा योजनेतील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खालील कामांना एपीओ ची सही नसतानाही प्रशासकीय मान्यता (प्रमा) देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे :
खडिकरण कामे,पानंद रस्ते,विहिरी,गायगोठे,फळबाग लागवड,वृक्ष लागवड या सर्व कामांसाठी नरेगा मार्गदर्शक सूचनांनुसार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (ए पी ओ) ची लेखी मंजुरी आवश्यक असते, मात्र ती डावलून वर्ककोड काढण्यात आली आहे.
नरेगा ही योजना ग्रामीण गरिबांसाठी असताना, नियमबाह्य मंजुरी देऊन लोकांच्या हक्काच्या रोजगारावर आणि सरकारी निधीवर डल्ला मारला जात असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.
जर ए पी ओ ची सही आवश्यक नसेल, तर मग नरेगा कायदा, शासन परिपत्रके आणि मार्गदर्शक तत्त्वे फक्त कागदावरच आहेत का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, तसेच बेकायदेशीररित्या काढलेले सर्व वर्ककोड रद्द करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे.

चौकट
जिल्हा पातळीवर नियंत्रण शून्य?

अत्यंत गंभीर बाब म्हणजे, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा), जिल्हा परिषद बीड यांचे या प्रकारावर कोणतेही नियंत्रण किंवा कारवाई दिसून येत नाही. त्यामुळे हा प्रकार केवळ पंचायत समितीपुरता मर्यादित नसून वरपर्यंत साटेलोटे आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

error: Content is protected !!