केज/ प्रतिनिधी
जानेवारी २०२६ सोमवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज या शाळेत “राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद” यांच्या प्रतीमेस या शाळेतील विद्यार्थिनींनी पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन केले.राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जाधव घराण्यात झाला.वडील लखुजी जाधव व आई म्हाळसाबाई होते.भाऊ दत्ताजी जाधव.त्यांचा विवाह वेरुळच्या भोसले घराण्यातील शहाजी राजे भोसले यांच्याशी लहान वयात दौलताबाद येथे झाला.त्यांनी छत्रपती शिवाजी राजे महाराज भोसले यांना उत्तम संस्कार दिले.चांगली शिकवण दिली.त्यामुळेच “हिंदवी स्वराज्याची” स्थापना झाली.अशा सुसंस्कार केल्याने या राजमाता जिजाऊ मॉंसाहेबास त्रिवार अभिवादन तसेच स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जाते १८६३ रोजी कोलकाता येथे झाला.ते एक भारतीय महान योगी,तत्वज्ञ, समाजसुधारक होते.त्यांनी वेदांत आणि योगाची शिकवण पाश्चात्य जगाला दिली.त्यांचे मुळ नाव नरेंद्र दत्त हे होते.त्यांचे “रामकृष्ण परमहंस ” हे गुरु होते.त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.उठा,जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका असे स्वामी विवेकानंदांनी युवकांना प्रेरीत केले.स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय”युवा दिन” साजरा करण्यात येतो.असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.या शाळेचे प्राथमिक पदवीधर शिक्षक डॉ रामकिशन ग्यानबा मुळे सर व संदीप मेघराज ठोंबरे सर यांनी सविस्तर माहिती दिली.श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर, राहुल बजरंग बचुटे सर, आबासाहेब तुळशिराम धपाटे सर, श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम, श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम, ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे/थोरात मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात या शाळेतील बहुतांश विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमानिमित्त बहुतांश विद्यार्थिंनी राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या वेशभुषा करून उपस्थित होत्या.या कार्यक्रमास गट साधन केंद्र केज घच्या साधन व्यक्ती सय्यद मॅडम व कदम मॅडम , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.शालु विजय थोरात, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक,शिक्षणप्रेमी नागरिक, अंगणवाडीताई, मदतनिस,पीएम पोषण शक्ती निर्माण योजना कामगार स्वर्णमाला पवार, अनिता पवार,माता पालक, गावकरी,सर्व शिक्षक शिक्षिका वृंद , विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.या वेळी “बालविवाह प्रतिबंधक” शपथ घेण्यात आली व श्री.डॉ.रामकिशन मुळे सर व श्री आकाश दत्तात्रय लोंढे सर यांनी बालविवाह प्रतिबंधक बाबत सविस्तर माहिती दिली.राजमाता “जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद” यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली व विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.”मी ज्ञानी होणार” या उपक्रमाची १२ जानेवारी रोजी अंतिम चाचणी परीक्षा घेण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इ.७ वीची विद्यार्थीनी सिध्दी विजय थोरात यांनी केले व आर्या अमोल थोरात यांनी आभार मानले .





















