अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथील सूरताल संगीत विद्यालय व कलारत्न पुरस्कार गौरव समिती यांच्या वतीने दरवर्षी पं.विष्णू दिगंबर पुरस्कार स्मृती पुरस्कार देण्यात येतो या वर्षी नूतन कार्यकारीणी करण्यात आली त्यात अध्यक्ष श्री सत्यवान शिंदे उपाध्यक्ष पत्रकार राहूल देशपांडे,सचिव बाबुराव बाभुळगावकर सदस्य म्हणून अमोल घोडके,सत्यजित शिंदे,अंबादास फटांगरे,अनिल वैरागे यांचा समावेश करण्यात आला असून पं.विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी कलावंत,गायक वादक,सांप्रदायिक अशा संगीत क्षेत्रातील कलावंतांना पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती नुतन अध्यक्ष सत्यवान शिंदे यांनी दिली.नूतन कार्यकारिणीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.





















