केज/प्रतिनिधी
केज शहरातील महात्मा फुले नगर भागातील जे.के. फंक्शन हॉल येथे गौरव सोहळा भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधाना मुळेच महिलांना समान संधीचा हक्क मिळाला आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. हारुणभाई इनामदार यांनी केले आहे तर परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना स्वावलंबी जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले नसते तर महिलांना आजही चूल आणि मूल हेच काम करावे लागले असते. आज महिला स्वालंबी बनल्या आहेत मोठमोठ्या पदावर विराजमान झालेल्या आहेत ही देन बाबासाहेबांचीच आहे असे मत नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे भारतीय संविधानाचे महत्त्व आणि संविधानाचा प्रसार हा सर्वसाधारण घटकापर्यंत पोहोचून महिलांना भारतीय संविधान दिन साजरा करण्याची संधी मिळावी व गौरव सोहळा भारतीय संविधानाच्या उत्सवांमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असावा हा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. सीताताई बनसोड तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ.हारुणभाई इनामदार, नगरसेविका सौ.पद्मिनी अक्का शिंदे, मावीमच्या केज तालुका शाखा व्यवस्थापक श्रीमती रामकवर आंधळे मॅडम, बोधने मॅडम, मावीमच्या सखुबाई गायके, जनविकास परिवर्तन आघाडी ग्रामीणचे उपाध्यक्ष श्रीकांतराजे जाधव, युवा नेते लखन हजारे, पत्रकार तात्या गवळी, युवा नेते अशोक गायकवाड, डायमंड टेलर, डॉ. नौशाद शेख, लहुजी शक्ती सेना महिला आघाडीच्या प्रियांका लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, मातारमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप-धुपानी पूजन करून संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे व महिलांचे आयोजकाच्या वतीने शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून संविधान दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगून संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकार विवेक बनसोड, राहुल इनकर, अशोक धीवार, सुहास समुद्रे, किरण जोगदंड, पवन बनसोड, गणेश गालफाडे, ओम शिनगारे, सुरज वैरागे, संदेश ताकतोडे, लताताई वाघमारे, सारिका शिंदे, पंचशीला पवळे, वर्षा राख, पुनम शिनगारे, सविता कांबळे, कविता मस्के, विमल जोगदंड, भाग्यश्री गायकवाड, सुनिता कदम, सगजानाबाई गायकवाड, बबीता मस्के यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी विवेक बनसोड,राहुल इनकर, अशोक धीवार, सुहास समुद्रे, किरण जोगदंड, पवन बनसोड, गणेश गालफाडे, ओम शिनगारे, सुरज वैरागे, संदेश ताकतोडे यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्रीमती श्रुती भुसारे मॅडम यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता ही अल्पोपहारणी करण्यात आली





















