धारूर प्रतिनिधी : सचिन घोडके
निवडणुकीच्या धामधुमीमध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा कडे धारूर नगर परिषदेचे दुर्लक्ष आहे. सध्या धारूर निवडणूक 2025 सुरू आहे. या निवडणुकीचे कामकाज चालू आहे या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये नगरपरिषदेकडून नागरिकांना दिले जाणाऱ्या सुविधा याकडे मात्र नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.
अर्धे धारूर शहर अंधारात असून अनेक ठिकाणी ट्यूबलाईट बंद अवस्थेत आहेत. सगळीकडे अंधार पसरलेला आहे. या अंधारामध्ये रस्त्याने चालताना नागरिक पडत आहेत. चोरीच्या घटनाही घडू शकतात त्यामुळे नगरपरिषदेने ज्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाहीये ट्यूबलाईट व्यवस्था नाहीयेत अशा खांबावरती लाईट बसवून घ्याव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्याचबरोबर पाणी समस्या ही धारूरच्या नागरिकांना भेडसावत आहे. पाणी वेळेवर सोडले जात नाही. पाणी वेळेवर येत नाही अशा तक्रारी ही आता नागरिक करू लागले आहेत. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी निवडणूक काम तर करावीच परंतु त्याचबरोबर नागरिकांना सोयी सुविधाही द्याव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.





















