Homeमहाराष्ट्रकेज शहरातील फुलेनगर येथे नामविस्तार दिन साजरा नामविस्तार लढ्यातील शहिदांना...

केज शहरातील फुलेनगर येथे नामविस्तार दिन साजरा नामविस्तार लढ्यातील शहिदांना केले अभिवादन.

केज/प्रतिनिधी

केज शहरातील महात्मा फुले नगर,हाउसिंग कॉलनी, आंबेडकर नगर भागातील एल. एफ.सी. चौक येथे नामविस्तार दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी नामांतर लढ्यातील शहीद भीमसैनिकांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांच्या व उपस्थितांच्या हस्ते ध्वजारोहण करून तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूप-दीपाने पूजन करून अभिवादन करण्यात आले. व सामूहिक बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी मोठा लढा उभारून प्रदीर्घ संघर्ष हा आंबेडकर चळवळीतील पॅंथर, भीमसैनिकांना करावा लागला. या संघर्षामध्ये अनेक भीमसैनिकांनी आपल्या जीवाची परवा न करता लढले. काही भीमसैनिक शहीद झाले तर काही पॅंथर, भीमसैनिकांना कारावास भोगावा लागला.
संबंध राज्यभर १४ जानेवारी रोजी नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. त्याच अनुषंगाने
प्रत्येक वर्षी केज शहरातील महात्मा फुले नगर येथे मोठ्या उत्साहामध्ये मराठवाडा नामविस्तार दिन साजरा करत आहेत. याही वर्षी देखील वरील ठिकाणी नामविस्तार दिन हा बौद्ध उपासक-उपासिका, बालक- बालिका यांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला.
यावेळी नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड, नगरसेविका पद्मिनी आक्का शिंदे, ज्येष्ठ नेते धनराज सोनवणे, अशोक गायकवाड, पत्रकार तात्या गवळी, पत्रकार विवेक बनसोड, राहुल इनकर, किरण जोगदंड, अशोक धीवार, संदिपान गायकवाड सर, अनंत शिरसट, बाळासाहेब मस्के, भारतीय बौद्ध महासभेच्या महिला तालुका शाखेच्या अध्यक्षा महानंदाताई गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेच्या सरचिटणीस मीराताई गवळी, भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार सचिव ज्योतीताई शिरसट, प्रमिलाताई मस्के, सविताताई कांबळे, सारिकाताई शिंदे, विमलताई जोगदंड, काळे ताई, हजारे ताई यांच्यासह महात्मा फुले नगर, हाउसिंग कॉलनी, आंबेडकर नगर भागातील बौद्ध उपासक-उपासिका,बालक- बालिका उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेष्ठ पञकार श्री.सतीश केजकर यांच्या वयाची साठी तर पत्रकारीतेची चौतीस वर्षे १६ जुन रोजी...

केज/प्रतिनिधी केज येथील ज्येष्ठ पत्रकार श्री.सतीश व्यंकटराव केजकर यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाली.तर पत्रकारितेत ३४ वर्षाचा पण प्रवास त्यांनी पूर्ण केला.त्यांनी वयाचे अर्धे...

संत महात्मे यांच्या उपस्थितीत साजरा झाला दगडूभाऊ दळवे यांचा वाढदिवस

केज प्रतिनिधी चिंचोली ( माळी) येथील कर्मवीर शिक्षण संस्थेचे संचालक, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला, शैक्षणिक ,राजकीय, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर, सर्वांच्या...

बीड जिल्हाधिकारी कार्यालय वर होणाऱ्या महामोर्चास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा-उमेश आवाड

केज /प्रतिनिधी केज.अ बर क ग उप वर्गीकरण आरक्षणाच्या स्मरणार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाचा महामोर्चा येणाऱ्या 16 जून ला धडकणार आहे. बऱ्याच वर्षापासून...

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

error: Content is protected !!