Homeमहाराष्ट्रअपघातग्रस्त सुदे कुठुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने दहा लक्ष रूपयांची मदत...

अपघातग्रस्त सुदे कुठुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने दहा लक्ष रूपयांची मदत – ॲड.राजेश्वर चव्हाण

किल्ले धारूर (प्रतिनिधि)

धारूर तालुक्यातील धुनकवाड पाटी जवळ चार दिवसापुर्वी बीड अग्नीशमन दलाच्या गाडीने अपघातग्रस्त झालेल्या सुदे कुटुंबातील सौ.कुसुमताई विष्णू सुदे यांचे उपचारादरम्यान लातूर येथे दु:खद निधन झाले असून विष्णू दामोदर सुदे यांची प्रकृती गंभीर आहे.त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये उच्च प्रतिचे उपचार चालु आहेत.या कुटुंबाच्या उपचाराचा सर्व खर्च शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.या बाबत चे आदेश उप मुख्यमंत्री ना.अजिददादा पवार साहेब यांनी जिल्हाधिकारी,बीड यांना दिलेले आहेत.
या घटनेबद्दल माझ्याशी भ्रमणध्वनीवरून बोलताना ना.अजीतदादा पवार साहेब म्हणाले की,घटना खूप दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे.या घटनेत विष्णू सुदे यांच्यावर उच्च प्रतिचे उपचार चालू असून त्यांची प्रकृती लवकर चांगली व्हावी या साठी ईश्वलाला प्रार्थना करतो.परंतू या घटनेत आमची लाडकी भगिनी सौ.कुसुमताई विष्णू सुदे यांचे उपचारादरम्यान दु:खद निधन झाले आहे.यामुळे मला व्यक्तिश: खूप दु:ख झालेले आहे.या घटनेमुळे सुदे-तुंबड परिवाराला झालेल्या दु:खात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत आहे.
झालेली घटना खूप दु:खद आहे.गेलेली आमची लाडकी भगिनी परत येणार नाही परंतू शिव,शाह,फुले,आंबेडकर,स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचाराने चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणालाही उघड्यावर पडू देणार नाही.करीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन्ही मुलींचे शिक्षण व भविष्यासाठी या कुठुंबाला दहा लक्ष रूपयाची सानुग्रह मदत देत आसून दोन मुलींच्या नावे पाच पाच लक्ष रुपये स्टेट बँक ऑफ इंडीया,शाखा धारूर येथे त्यांच्या वयाच्या आठरा वर्षाच्या मुदतीपर्यंत फिक्स डिपॉझिट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,बीड च्या वतीने करणे बाबत मला आदेशीत केले आहे. करीता तात्काळ मुलींचे बँक खाते काढून पाच पाच लक्ष रूपये दोन्ही मुलींच्या नावे फिक्स डिपॉझिट करणार असल्याची माहीती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण यांनी माध्यमांना दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!