Homeमहाराष्ट्रपारा जिल्हा परिषद सर्कल मधून सौ.अश्विनी उंदरे यांचा ५ हजार ५८० मतांनी...

पारा जिल्हा परिषद सर्कल मधून सौ.अश्विनी उंदरे यांचा ५ हजार ५८० मतांनी दणदणीत विजय

सौ.अश्विनी सुनील उंदरे यांच्या माध्यमातून प्रथमच पिंपळवाडीकरांच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

वाशी/प्रतिनिधी

पारा जिल्हा परिषद सर्कल मधून सौ.अश्विनी सुनील उंदरे यांचा ५ हजार ५८० मतांनी दणदणीत विजय झाला आहे,
सौ.अश्विनी सुनील उंदरे यांच्या माध्यमातून प्रथमच पिंपळवाडीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आज पर्यंतच्या राजकारणामध्ये पिंपळवाडीकरांना कुठल्याच पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीची उमेदवारी दिली नव्हती अथवा आजपर्यंत पिंपळवाडी येथील नागरिक हे उमेदवार म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते. प्रथमच गावचे प्रथम नागरिक तथा वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील माणिकराव उंदरे यांच्या सुविद्य पत्नी सौ.अश्विनी उंदरे या पारा जिल्हा परिषद सर्कल मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या त्यांना तब्बल ५ हजार ५८० मताधिक्य मिळाले आहे, सौ. अश्विनी उंदरे यांची २ हजार १८६ मतांनी निवड झाली आहे.
सौ. अश्विनी उंदरे यांच्या निवडीचा निकाल हाती येताच ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करून विजयी मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, राज्यातील पहिल्या टप्प्यातील धाराशिव जिल्ह्याची जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान हे दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडले होते.
या निवडणुकीच्या रिंगणात सौ.अश्विनी सुनील उंदरू,लक्ष्मी गणेश भराटे,संध्या ज्ञानोबा मुरकुटे, रूपाली सुजित लोकरे, मुक्ता अतुल चौधरी या पारा जिल्हा परिषद सर्कल मधून उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होत्या.
सोमवार रोजी लागलेल्या निकालामध्ये एकूण१५ हजार ७५९ वैध मतदानापैकी उमेदवारांना मिळालेली मते सौ. अश्विनी सुनील उंदरे:-५५८०, रूपाली सुजित लोकरे:-३३९४, लक्ष्मी गणेश भराटे:-२८४२, संध्या ज्ञानोबा मुरकुटे:-२५१३, मुक्ता अतुल चौधरी:-१३५३, नोटा:-७७ एकूण मिळालेली मते आहेत. या निवडणुकीत सौ.अश्विनी सुनील उंदरे यांना एकूण मिळालेली मते ५ हजार ५८०, सौ. अश्विनी सुनील उंदरे यांची नवनिर्वाचित पारा जिल्हा परिषद सदस्य पदी २ हजार १८६ मतांनी निवड झाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षांच्या प्रमुख वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पारा जिल्हा परिषद सर्कल मधून सौ. अश्विनी सुनील उंदरे तर पारा पंचायत समिती गणातुन अशोक रामदास भराटे व बावी पंचायत समिती गणातुन नितीन शिवाजी रणदिवे यांचा मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय झालेला आहे.
नवनिर्वाचित सदस्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!